पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीजगीत

//सरस्वती देवी प्रसन्न // बीजगीत  आपण  दैनंदिन जीवनात  सर्वसाधारणपणे असं बघतो की एकीकडे अमाप मुबलकता आहे   मग ती साधन संपत्तीची  (उदा -जमीन,घराची जागा ,पाणी ,वाहन )  अथवा रिकामा  वेळ  आणि यातून  चैन ,सुखलोलुपता  आणि  अंतिमतः उन्मादाकडे वाटचाल सुरु आहे.  तर  एकीकडे यापासून वंचित असा समाज आहे .   विसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीस अनेक सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विसंगतीतील संगती अशी की साऱ्या  नव्या पिढीस  आपल्या घरची आर्थिक स्थिती  काहीही असो सर्व प्रकारची आधुनिक  वाहनं  व Gadgets वापरण्यास हवी असतात. बदलती कुटुंब व्यवस्था  Nuclear Family  आणि  परिणाम म्हणून मिळालेलं अनिर्बंध स्वातंत्र्य यातून नवीन पिढीस लहान मुलांना सहजचं हाती सर्व काही फारसं काही  शारीरीक वा मानसिक  न कष्ट पडता  मिळू लागलं आहे .  आधुनिक Gadgets चा वापर कसा करावयाचा याचं भान  हे  सारेच जण श्रीमंत कुटूंबातील अ...

डायरी

इमेज
डायरी नववर्ष लेवुनी आले ३६५ दिवसाची पाने सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेली बांधणी माहित आहेत रंग काही धाग्यांचे काही मात्र गुलदस्त्यात .... संकल्पांचा बुकमार्क घेईल नव्याचे नऊ दिवस होणार नाहीत याची काळजी प्रौढत्वी निज शैशवास जपणे , सत्पात्री यथाशक्ती दानधर्म काय वाचा मनोभावे सदा घडो सत्कर्म दिले आहेत गुणांक ज्यादा व्यायाम आणि नामस्मरण यांस कारण तेच आहे जीवनमर्म घेईन रोज आढावा झोपी जाण्याआधी मिळाले किती गुण कळण्या गुण मापनपट्टी करी उजळणी पानोपानी दूर ठेवीन संकल्प विकल्पास जागवून सत्प्रवृत्ती हरदिनी वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसावा .

लेखणीचा प्रवास...

लेखणीचा प्रवास... बालपणी सलगी पाटी वरील- पांढऱ्या ठिसूळ पेन्सिलशी क्षणात विसरी काही, क्षणात नवीन हवे काही, निरागसच सर्व काही षड्रिपूशी सलगी नाही... आणि जाता वरच्या इ यत्तेत हाती षटकोनी पेन्सिल आणि वही टोक मुंड होता खूर (Sharpner) येई कामी, सोलता वर्तुळाकार टरफले वाटे मजा भारी खोडण्या काही चूक आता हाती सुगंधी खोडरबर पण चढत जाता वरची इयत्ता येई हाती शाईपेन सांडता शाई मदत करी टीपकागद पण चूक होता पुसून टाकणे पडे भारी , खूण चूकीची राही पानी भाग्य सारं बदलत जाई हाती पडी बॉल पेन आता चूक पुसणे होई महाकठीण साठी वय होता कळे,उमगे अरे काया वाचा मन हीच तर पेनं होती सारी हा तर प्रवास झाला होऊन सलगी षड्रिपूशी मीच लिहून ठेवी पुनर्जन्माची ललाट रेषा ही तर मानव जन्मा तुझी कहाणी म्हणून आता आठवी तुक्याचा अभंग लहाणपण देगा देवा,मुंगी साखर रवा.