शाश्वत













श्रीमत्  दासबोध, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने , आदरणीय फडके शास्त्रीकृत सद्गुरु लीलामृत उपासना ग्रंथ यांची शिकवण अन् आदरणीय दादा (श्री पद्माकर बोंडाळे ) यांचे सतत मार्गदर्शन, प्रबोध यातून अवतरले हे काव्य सांगण्या....

 

या जगी  काय शाश्वत अश्वाशत 

काय असे शिष्य सदगुरू लक्षण

कसा होई जीवन मार्ग उन्नत सुलभ

बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध होय जाण 

करुनी आदर भावे सर्वां सदा प्रणिपात

श्रीराम चरणी अर्पण 

न्यून ते करून घ्यावे पूर्ण

 🙏🙏 

 

विश्व व्यापारा नाही गणती 

सहज सुंदर प्रेमभाव नसे मिती.

तोल मोल असे सर्वांसी 

मुके जीव आपणा सांगती,

 पुढें करावा हात, मिळतील मग बहु सांगाती

असे होत होत मिळते सद्गती आणि नरदेह मिळती 

 उन्नत करण्या हा नरदेह

साधनात साधन 

ते उत्तम नामस्मरण 

वासना बीज भाजे जाळे 

देव कोण मी कोण कळे अन् आकळे 

भ्रांती सर्वथा पळे , 


 परीस स्पर्श होता  लोह होई सुवर्ण 

 परि इथे शिष्य गुरू न भेदाभेद

सद्गुरु करती आपणासारखे तत्काळ, 


 जरी आपण असे अनन्य

 सगुण उपासना हा नित्यनेम 

असुनी ज्ञानी, नाही रूप प्रगट करी 

नसे गर्व अहंता उरी  

एकजागी न राही फार काळ 

सद्गुरु आज्ञा होता घडे प्रबोध कार्य 

अवघ्या प्राणिमात्र कल्याणा...

पाहून  जाणून सान थोर

मानत मानत शिकवीत जाय 

उद्धरती जन सज्जन


अवतरती  पुनः पुनः या अवनी वरती

जरी असती स्व स्वरुप तरी लौकिकी रूप वेगळे 

काही करण्या भगवदकार्य आगळे, 

बहुत जनांचे जीवन उजळे

यशसह कीर्ती सुगंध परिमळे

 मरण यांचे स्वाधीन,

 होता कार्य पावती अंतर्धान 

श्रीराम चरणी अर्पण 🙏🙏

चलचित्र इंस्टाग्राम account wild verse official वरून हे काव्य सुचले त्याविषयी करतो व्यक्त कृतज्ञताभाव.

https://www.instagram.com/reel/DYdgjRwANyG/?igsh=aW0yYm5qZ3FqbWJy

टिप्पण्या

अनिल पाठक म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
अनिल पाठक म्हणाले…
पशु योनीतून सत्कर्माने मनुष्य योनीची प्राप्ती आणि मनुष्य योनीचे सार्थक कशात आहे, हे सगळं काव्यात छान गुंफले आहे. परीस लोखंडाचे सोने करतो तर सद्गुरू लोखंडालाच परीस बनवतो, आपल्यासारखे करिती तात्काळ. वाह! बहुत खूब!!
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
तुझा आपुलकीचा अभ्यासपूर्ण अभिप्राय वाचून खूप बरं वाटलं. श्रीराम समर्थ 🙏
डॉक्टर सुषमा खानापूरकर, भुसावळ. म्हणाले…
नंदू , अरे तू हे जे सगळं लिहिले आहेस ते वाचताना मन थक्क होते. खूप साधे सोपे पण अर्थपूर्ण आणि प्रवाही लिहितोस. वाचून झाले की मनाला शांत प्रसन्न वाटते. जेव्हा कधी लिहावेसे वाटते तेव्हा अवश्य लिहीत जा, लिहीत रहा. हे तू लिहीत नाहीस तर तुझ्या हातून स्रवते आहे. तुझ्या सात्विक चिंतनाला माझा मनापासून 🙏🌷नमस्कार
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सुषमा ,तुझा आपुलकीचा अभिप्राय याने नवऊर्जा मिळते. कारण तुझा आध्यात्मिक अभ्यास खूप आहे तू पुस्तके लिहिली आहेस म्हणून.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

तुझ्या नामात रे गोडवा ......

वर्षाव