पोस्ट्स

गाई घरा आल्या ...रसग्रहण

इमेज
गाई घरा आल्या    घणघण घंटानाद   कुणीकडे घालूं  साद गोविंदा रे ?   ‘ गाई घरा आल्या ’ ही   कवी वा गो मायदेव यांची   एक अर्थवाही करूण भाव व्यक्त करणारी कविता आहे. शेतीवाडी , घरदार गाई गोठा ही खेडेगावातील समृद्धी .गाई म्हशी हे दूधदुभतं देणार पशुधन. अशाच एका समृद्ध घरात संध्याकाळ झालेली आहे. गाईगुरांच्या परतीची वेळ झाली आहे. घर मालकीण माऊली त्यांची वाट पाहत आहे.गुराख्याच्या संगीतीने चरावयास गेलेल्या सर्व गाई हळूहळू परत येत आहेत , गाईच्या गळ्यातील घंटेचा नाद अंगणात , गोठ्यात घुमत आहे. आता सर्व गायी परतल्या , मात्र गोविंदा(गुराखी )परत आलेला नाही. त्याची वाट पाहत ती आता काळजीग्रस्त झाली आहे. त्या माऊलीच्या जिवाची घालमेल सुरु आहे -का आला नाही गोविंदा? केव्हा येईल ?या विचारात ती पडली आहे. या परिस्थितीचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्या माऊलीची जितकी माया गाई गुरांवर आहे तितकीच माया त्या गुराख्यावरही आहे. हा कान्हा गुराखीच त्या गुरांना सांभाळत आहे .त्या गुरांना त्या मुक्या जनावरांना त्याने माया लावलेली आहे .त्याच्या बासरीतील मंजुळ ध्वनीच्या लयीत ती ...

सृजनाचा मोहोर....

इमेज
  मधुकोश संकुलातील सांस्कृतिक वातावरण आणि पर्यावरण हर्षदायी आहे. दिनभर वृक्ष फुलझाडे दृष्टीस आनंद देतात कधी हवाहवासा वारा तर कधी हलकीशी झुळूक व त्यावर बागडणारे पक्षी आणि खारुताई यांचे मंजुळ आवाज कान तृप्त करतात. दुडूदुडू धावणारी बाल गोपाळ मंडळी, त्यांच्या बुटांचा गमीतीदार आवाज , सायकल शिकणं ,थोड्या मोठ्या मुलां मुलींचे नाविन्यपूर्ण खेळ ,धावा धावी- लपाछपी , कधी मांजर आणि लाडका कुत्रा या पाळीव प्राण्याशी मुलांचा संवाद. असा आनंदाचा ठेवा आबाल वृद्ध एकंदरीत पहाटे ते सायंकाळ पर्यंत सर्वच रहिवासी येथे लुटत असतात. असं दिवसभर नादमय वातावरण निसर्गाविषयीची कृतज्ञता आपल्या मनात जागी करतात. हे सार वैभव अमूल्य आहे. ऋतू बदल घडत असताना निसर्गातील मनोहरी विभ्रम आपल्याला या परिसरात पहायला मिळतात. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त याची मजा तर काही औरच. एकंदरीत या सर्वांमुळे तनमन प्रसन्न होते; चित्तवृत्ती फुलून येतात. आणि आता तर ऋतूंचा राजा वसंत याचे राज्य सुरू आहे. मागील आठवड्यात सकाळच्या वेळी फेरफटका मारताना आंब्याच्या झाडांवरील मोहोर दृष्टीस पडला आणि मन मोहरून गेले. मोबाईल मध...

आला क्षण.... गेला क्षण...

इमेज
आज सकाळी गच्चीत कपडे वाळत घालताना अंगावर येत होतं कोवळं ऊन,आनंद उल्हासीत होत होतं...  तन मन आणि क्षणात गच्चीसमोरच्या निलगिरीच्या झाडावरील अडकलेला पतंग दृष्टीस पडला .  झाले मन खिन्न आणि मग ....सुचल्या या काव्यपंक्ती.....  आला क्षण.... गेला क्षण... पतंग झेपे उंच आकाशात घेई भरारी झोकात पतंग दोरी बालकाच्या हातात खुले हास्य भारी गालात पतंग आणि बालक दोघे आता नाचू लागले तालात  डौलात क्षणात होई घात काटतो कुणी पतंग दोरी वरचेवरी आकाशात होई वाताहात मग हिरमुसे बालक होई खिन्न शोध घेई दिनभर दमून झोपे आईच्या मांडीवर पतंगही खिन्न अडकला झाडावर अंग चोरून घेई फांदीवर स्वप्न पडे बालका बोली पतंग येशील कधी करण्या माझी सुटका सुरु होण्या खेळ पुन्हा आपुल्या मनासारखा सुटला पहाट वारा लागे चाहूल तयास जाणलं  त्यानं झाले दोन सवंगडी उदास मिटवाया तगमग हालू लागे फांदी पुटपुटे पतंग स्वतःशी बरे झाले अडकलो आपण हिरव्या पानात फांदीपाशी वारा येई जोराचा, फांदी हले झुले वर-खाली नादात हलकेच सोडून देई पतंगाला त्याच्या अंगणात होता सूर्योदय बालक होई जागे पाहता अंगणात पतंग धरे त्याला हातात बिलगी आई-बाब...

स्वरमयी प्रभा-

इमेज
  // श्री सरस्वती माता प्रसन्न // स्वरमयी प्रभा- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे  यांना २६ जानेवारी २०२२ च्या पूर्वसंध्येस "पद्मविभूषण " पुरस्कार जाहीर झाला. एक महान गायिका, अतिशय समर्थ शिक्षिका, संगीताच्या अभ्यासक, लेखिका व कवयित्रीही असं दिव्य प्रतिभेचं लेणं ल्यायलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विदुषी स्वरयोगिनी प्रभा अत्रे . सामान्य माणूस ज्याला शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही तो ही त्यांच्या मारुबिहाग ,कलावती व मिश्र खमाज मधील कौन गली मोरा श्याम ही ठुमरी असलेल्या प्रसिद्ध  ध्वनिमुद्रिकेतील स्वर  कानावर पडताच अंतर्मुख होतो . या ध्वनिमुद्रिकेस अमाप लोकप्रियता लाभली  आणि आजही जवळजवळ पन्नास वर्षे ती तशीच टिकून आहे.जेव्हा जेव्हा रागांवर आधारित गाण्यांचा विषय निघतो त्यावेळी कलावती आणि मारुबिहाग हे नाव निघताच डॉक्टर प्रभा  अत्रे हे नाव ओठावर लगेच येते. 'प्रथम तुझं पाहता' हे मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत अथवा' दे मला दे चंद्रिके प्रीती तुझी' अशी गाणी ऐकली की ती कलावती या रागावर आधारित गाणी आहेत असं  शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहीत नसणाऱ्य...