कवितेचं गाणं .....

कवितेचं गाणं होतं म्हणजे काय होतं ? प्राची वर रविबिंब उमटतं पक्षी कूजन श्रुती वर पडतं तान्हुलं पाळण्यात हसतं, वाळा नाद कानी पडतो... काही दिवसांत बाळाचा आ... आ बोल कानी पडतो माऊली सुखावते .... नदीच्या पाण्यावर लहरी नाद जाणवतो चित्रकार चित्रात रंग भरू लागतो मूर्तिकाराने साकारलेल्या मूर्तिस टिळा लावला जातो वारा झुळूकतो अन् तृण पात्यांवर दवबिंदू अवतरतात धरतीवर प्राजक्ताचा सडा पडतो अत्तराची कुपी उघडली जाते मोराचा पिसारा फुलू लागतो वातीचे ज्योतीत रूपांतर होत स्थितीला गती प्राप्त होते क्षण भर कां होईना , क्षण भर कां होईना जिवा- शिवा ची गाठ पडते, जिवा- शिवा ची गाठ पडते _ नंदकिशोर लेले