ऑफ पिरीयड
.jpeg)
प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री विनायक महादेव कुलकर्णी उर्फ वि म कुलकर्णी यांचा १३ मे हा स्मृतिदिन. सोलापूरात दयानंद कॉलेजला १९७५ साली एक विलक्षण योग माझ्या आयुष्यात आला, कारण सर ऑफ पिरियडला वर्गावर आले आणि त्यांनी स्वतःचीच" सांभाळ ही वीणा" ही कविता आम्हास समजावून सांगितली. आळंदीच्या माऊलीच्या मंदिरात भगवंताचे नाम घेत वीणा वादन सतत सुरू असते. ती वीणा कधीही खाली ठेवली जात नाही. संसारी माणसाशी या वीणेचा कसा अनन्य संबंध आहे.ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे.अतिशय तळमळीने शिकवलेली ही कविता माझ्या मनात घर करून राहिली आहे तो सारा क्षण या लेखात मी रंगवला आहे. ऑफ पिरीयड शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना ठराविक वेळापत्रकाप्रमाणे विषय शिकवले जातात. विषय वेळ व शिक्षक/ प्राध्यापक यानुसार दैनंदिन अभ्यासक्रम सुरू असतो. काही वेळा मात्र असे घडते की काही कारणांनी नेमून दिलेले शिक्षक/ प्राध्यापक वर्गात येऊ शकत नाहीत. आणि मग अशावेळी तो तास ऑफ पिरीयड म्हणून घोषित केला जातो. शिक्षण घेत असताना एखादा विषय अथवा तो विषय शिकवणारे शिक्षक , त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला आवडत नाही. आणि एखाद्...