कान्हूल्या....

 कान्हूल्या....


सोनूल्या ...माझा कान्हूल्या

नितळ कांती कुरळे कुंतल

हाती मनगटी पायी वाळे

कानी शुखंल कुंडल

गोड गोबरे गाल

परी लोभस अधिक ती जिवणी...

पाय दुमडता भासशी तू देवघरीचा रांगडा कृष्णकान्हा

नेत्री कोवळं कुतुहूल....

सागरतीरी न्याहळी स्व रूप

जळ निर्मळ तू निर्मळ

लडिवाळा ... भविष्यकाळ तुझा उज्वल

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
फोटो आणि कविता फारच सुंदर।
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आनंद वाटला की वाढतो हेच खरं. Thanks. प्लीज आपलं नाव सांगावं कारण ये comment बॉक्समध्ये आलं नाही.
Swachchand म्हणाले…
मस्त... फोटो, चारोळी आणि कान्हुल्या हे नाव पण
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
Sorry typing error .अभिप्राय वाचून आनंद वाढला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण