तुझ्या नामात रे गोडवा ......

 











सुमनताई 

गळ्यात, नामात अन् रूपात रे किती गोडवा...

किती गाऊ तव महिमा 

भाव दाटले 

साऱ्यां मराठी मनी 

अश्रू अनावर नयनी 


जरी असली बहुत 

परि  उल्लेखितो मोजकी गाणी

जागे केलेस आम्हा गाऊन जाग रे यादवा,

सावळ्या विठ्ठला

 केशवा माधवा 

तुझ्या नामात रे गोडवा, 



उठा उठा चिऊताई 

गाऊन जागे केलेस चिमण्या बाळा    

रिझवलेस  सान बालका अन् आईस 

जोजवित अंगाई निंबोणीच्या झाडामागे

बिंबविलीस माता महती गाऊन 

आईसारखे  दैवत साऱ्या या जगता नाही

सांगितले संसार मर्म गृहिणी कष्ट 

गाऊन बहिणाबाईचे 

अरे संसार संसार तवा चुल्ह्यावर 

 रिझवलेस तू प्रेमिका  रे क्षणांच्या संगतीने,

  झिमझिम झरती श्रावणधारा 

 धरतीच्या कलशात, जिथे सागरा धरणी मिळते ,

केतकीच्या बनात नाचला ग मोर

 एकदाच यावे सखया 

 कशी करू स्वागता म्हणूनी....

आणि 

अंतर्मुख केलेस आम्हा सर्वां .....

 उच्चारून समाधी घेऊन जाई ज्ञानदेव 

अवीट गाणी अन् मधूर शब्द 

अधिक अर्थवाही केलेस तयांना

जशी माय वाढवी लेकरांना

 

किती गोड तो गळा 

लाविलास 

साऱ्या मराठी मना लळा

अवघे मराठी मन हळहळे.....

केलेस तू आम्हा पारखे 

गेली लतादीदी आणि आशाताई

आणि पाठोपाठ 

तू ही आता सुमनताई 

कसे आवरू.....कसे सावरू....


वेळ  येताच सोडला देह 

 सारी वाद्ये झाली मुकी 

नच काही उमगे , 

बसली निमूट कोपऱ्यासंगे 


 जरी नरदेह नश्वर  

 जाहले  तव सूर 

 त्रिभुवनी अमर  

सार्थक केला जन्म 

जगून जगा वेगळे 

कीर्ती सुमन सुगंध परिमळे


होऊनी लिन 

नमन तुला त्रिवार 

करितो नंदकिशोर 

🙏🙏🙏

सुमन कल्याणपूर सर्व गीते लिंक

https://www.aathavanitli-gani.com/Swar/Suman_Kalyanpur


टिप्पण्या

Shrikant Lele म्हणाले…
खुप छान! सुमनताईंची लोकप्रिय गाणी काव्यात गुंफून वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली!
निनावी म्हणाले…
As nice as her voice. Cute and sweet. Nama, tala godva asach Ganya madhun anubhau..
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
धन्यवाद बाळ तू वाचून अभिप्राय दिलास आनंद वाटला.
Jayant Kale म्हणाले…
सुमनताईंच्या समाधी घेऊन जाई ज्ञानदेव आणि अन्य सर्व गीतांचा सुंदर उल्लेख केला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
निनावी म्हणाले…
नंदूजी, सुमनताईंची सर्वच गीते सुंदर आहेत.त्यातल्या निवडक गीतांची सुंदर गुंफण
करून अगदी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलीत.
👍👍🙏🌷🙏
निनावी म्हणाले…
नंदकिशोरजी , भावपूर्ण आदरांजली. सुमनजींच व्यक्तीमत्व देवापुढे लावलेल्याआ
नंदादीपासारख प्रासादिक आणि सात्विक होत. तसेच त्यांचे सूरही. तुमच्या मुक्तछंद रचनेत हे सर्व आले आहे. नादबध्द रचना
अशोक आफळे.
अनिल पानसे UWB सातारा म्हणाले…
अनिल जी आपल्या आपुलकीच्या अभिप्रायाने खूप बरं वाटलं.
अशोक आफळे म्हणाले…
आपले साहेब आपल्या अभिप्रायाची वाट पाहत होतो तो मिळाला खूप खूप आनंद झाला. आपण म्हणलात तसं आदरणीय सुमनताई यांचं जगणं त्यांचं गाणं हे शांत तेवत्या नंदादीपाप्रमाणेच होते.
अनिल पाठक म्हणाले…
सुमनताईंची निवडक गीते कवितेत गुंफून भावपूर्ण काव्यश्रध्दांजली अर्पण केली आहे.
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
अनिल तू काव्य लगेचच आपुलकीनं वाचून
अभिप्राय दिलास आनंद झाला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणींचां गुलमोहर ....

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

बिंब प्रतिबिंब.....