तुझ्या नामात रे गोडवा ......
सुमनताई
गळ्यात, नामात अन् रूपात रे किती गोडवा...
किती गाऊ तव महिमा
भाव दाटले
साऱ्यां मराठी मनी
अश्रू अनावर नयनी
जरी असली बहुत
परि उल्लेखितो मोजकी गाणी
जागे केलेस आम्हा गाऊन जाग रे यादवा,
सावळ्या विठ्ठला
केशवा माधवा
तुझ्या नामात रे गोडवा,
उठा उठा चिऊताई
गाऊन जागे केलेस चिमण्या बाळा
रिझवलेस सान बालका अन् आईस
जोजवित अंगाई निंबोणीच्या झाडामागे
बिंबविलीस माता महती गाऊन
आईसारखे दैवत साऱ्या या जगता नाही
सांगितले संसार मर्म गृहिणी कष्ट
गाऊन बहिणाबाईचे
अरे संसार संसार तवा चुल्ह्यावर
रिझवलेस तू प्रेमिका रे क्षणांच्या संगतीने,
झिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात, जिथे सागरा धरणी मिळते ,
केतकीच्या बनात नाचला ग मोर
एकदाच यावे सखया
कशी करू स्वागता म्हणूनी....
आणि
अंतर्मुख केलेस आम्हा सर्वां .....
उच्चारून समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
अवीट गाणी अन् मधूर शब्द
अधिक अर्थवाही केलेस तयांना
जशी माय वाढवी लेकरांना
किती गोड तो गळा
लाविलास
साऱ्या मराठी मना लळा
अवघे मराठी मन हळहळे.....
केलेस तू आम्हा पारखे
गेली लतादीदी आणि आशाताई
आणि पाठोपाठ
तू ही आता सुमनताई
कसे आवरू.....कसे सावरू....
वेळ येताच सोडला देह
सारी वाद्ये झाली मुकी
नच काही उमगे ,
बसली निमूट कोपऱ्यासंगे
जरी नरदेह नश्वर
जाहले तव सूर
त्रिभुवनी अमर
सार्थक केला जन्म
जगून जगा वेगळे
कीर्ती सुमन सुगंध परिमळे
होऊनी लिन
नमन तुला त्रिवार
करितो नंदकिशोर
🙏🙏🙏
सुमन कल्याणपूर सर्व गीते लिंक
https://www.aathavanitli-gani.com/Swar/Suman_Kalyanpur

टिप्पण्या
करून अगदी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलीत.
👍👍🙏🌷🙏
नंदादीपासारख प्रासादिक आणि सात्विक होत. तसेच त्यांचे सूरही. तुमच्या मुक्तछंद रचनेत हे सर्व आले आहे. नादबध्द रचना
अशोक आफळे.
अभिप्राय दिलास आनंद झाला.