पोस्ट्स

चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें -रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें  तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे     अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां  होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां     कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे  दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे   गीतरचना- विश्वनाथ जोगळेकर संगीत- अनिल मोहिले गायक - शरद जांभेकर भक्ती संगीत यातून परमेश्वराला एक प्रकारची आळवणी असते; परमेश्वराचे गुणगान असते. आपण करतो ती श्रवण भक्ती असते. गाण्याचे अथवा कवितेचे रचनाकार कवी गीतकार आणि संगीतकार यांची ती किर्तन भक्ती असते. पहाटेच्या वेळेला सारे वातावरण शांत असतं. माणसाला झोप झाल्याने तनमनात उत्साह असतो.मन प्रसन्न असतं; अशा वेळेला भक्ती संगीत आपल्याला ईश्वर शक्तीशी जोडलं जाण्याची संधी देत असते. महाराष्ट्राला संतांची तसेच थोर कवी आणि गीतकार यांची परंपरा आहे. 'श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।' हा भागवतातील श्लोक उद्‌धृत करून, समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचे...

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरि हरि हरि रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली फुलारली झाडे -वेली जाग वारियासी आली वेळ शीतळ साजिरी पक्षी गाती नाना परी गेला दिस नाही येत काही करावे संचित साधा आपुलाले हित नाम वाचे उच्चारित नाम घेता घरी दारी उभा विठ्ठल कैवारी सरे अंधाराचा पाश झरे मोकळा प्रकाश मुखे करा नामघोष जाती जळूनिया दोष तुका म्हणे जन्मा वरी ठेवा तुळस- मंजिरी गीत- ग दि माडगूळकर संगीत आणि स्वर- स्नेहल भाटकर चित्रपट तुका झालासे कळस राग भूप आणि नट महाराष्ट्रामध्ये उज्वल आणि महान संत परंपरा आहे - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ समर्थ रामदास संत नामदेव बहिणाबाई आदि अनेक संत होऊन गेले. या संतांनी नरदेह दुर्मिळ असून या जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर ऐहिकात जगताना पारलौकिक कल्याण साधणे ही महत्त्वाचे आहे असे अभंग ओवी वांग्मय यातून नाना प्रकारे सांगितले आहे. प्रपंच जगत असतानाच परमार्थ करावयाचा आहे. कलियुगात संत सज्जन संगती, आणि नामस्मरण याचे अनन्य महत्व त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोणतेही उपास तपास, कठीण योगसाधना यापेक्षाही कोणतेह...

क्षण स्वाक्षरीचा -पंडित प्रभाकर कारेकर

इमेज
  क्षण स्वाक्षरीचा - गोवेकरी गानवैभव पंडित प्रभाकर कारेकर पंडित प्रभाकर कारेकर देवाघरी गेल्याची बातमी कळली आणि मन विषण्ण झालं . त्यांच्या सातारा येथील गायनाच्या मैफलीची आणि नवी मुंबई मध्ये  नोकरीस असताना झालेली प्रत्यक्ष भेट, मैफिल या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या.  त्यांच्या गायकीचा अनुभव सातारा येथे समर्थ सदनामध्ये अनेक वेळा अनुभवता आला. श्रीयुत अरुण गोडबोले हे बहु आयामी व्यक्तिमत्व त्यांना हक्काने पाचारण करत असे आणि सातारा भूषण या पुरस्कार निमित्ताने अथवा काही अन्य निमित्ताने समर्थ सदनात त्यांच्या मैफली होत असत. तसेच यासह अनेक  उत्तम कार्यक्रम वक्ता दशसहस्रेषु  शिवाजीराव भोसले , राम शेवाळकर यांची भाषणे ही समर्थ सदनात ऐकता आली हे आम्हांस लाभलेले थोर भाग्यच होय. गोव्याच्या मातीमध्ये अलौकिक सुगंध आहे. अनेक उत्तम साहित्यिक, संगीत नाट्य कलाकार मंडळी या भूमीमध्ये जन्मली आणि त्यांनी  मराठी जना मनात साहित्य आणि गाण्याचे संस्कार रुजवले,मनाचे समृद्ध उन्नयन केले. प्रभाकर कारेकर हे याच सधन, सजल, सकस पावन भूमीचे गानरत्न.मलमली झब्बा आणि पायजमा, मागे घेतलेले क...

नामस्मरण महती

इमेज
  श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज जयंती निमित्ताने ही काव्यांजली...   🌹नामस्मरण महती 🌹 सांगती वर्णिती सारे संत ग्रंथ नवविधा भक्ती महान थोरी,  रूचे, झेपे ते मुमुक्षू  नाम उच्चार करी. वारकरी जपे  राम कृष्ण हरि पांडुरग हरि,  रामभक्त जपे   श्रीराम जय राम जय जय राम  मंत्र त्रयोदशाक्षरी . नरदेह दुर्लभ परी त्रिविध ताप बद्ध  मुमुक्षु साधक सिद्ध प्रवास कठीण तारण्या कलियुगी नामस्मरण हाच सोपान  सांगती सारे महानुभाव संत सज्जन  नको देऊ परपीडा,  नको करू भेदभाव   आहे प्राणिमात्रा सर्व जीव समान  करिता नामजप जागृत होतो सदभाव  षड्रिपूवरी येते हळू हळू नियंत्रण होई  मन  चित्त  शुध्द पावन  लाभे  सुख शांती समाधान  कालचक्र गती अगम्य  करू आनंदे विहित कर्म  अखंड  घडो नामसाधना पार  करण्या एक एक पायरी  परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी  उमलले  काव्य सुमन  🌹दैनंदिन प्रवचन वाचनातून      अर्पितो  श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरणी...

अक्षयपात्र शारदेचे...

इमेज
अक्षयपात्र शारदेचे.. शारदा माते  वसंत पंचमी जन्मदिन   वाहतो म्हणूनी तवचरणी हे काव्यसुमन ऋषि मुनि संत महंत आचार्य अन् कवीगण  सांगती तव महिमा  रूप वर्णन नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तक धारिणी  आद्य शंकराचार्य म्हणती तू काश्मीरपुर निवासिनी, ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी  ज्ञानदेव म्हणती तू अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी, नामदेव म्हणती सारजा,  चतुराननाची आत्मजा, एकनाथ म्हणती सारासार विवेकमूर्ती,  स्फूर्तीची स्फूर्ती ,अमूर्ताची मूर्ति तुकाराम म्हणती माउली सारजा रामदास म्हणती शारदा मूळ चत्वार वाचा,  वेदमाता, शब्दमूळ वाग्देवता शब्दसंपदा पडे अपुरी  किती वर्णू तुझी रूपे भारी तारसी तू आम्हां संसारी    तू मूळमाया वसशी ओंकारी चंद्रबिंदूत  मानवात परा,पश्यंती,मध्यमा, वैखरी चार वाणीत   ५२ मुळाक्षरे यांत  १६ स्वर,३६ व्यंजन योजसी  देण्या ज्ञान  लेखणीतून मग प्रकट होई  महान ग्रंथसंपदा चार वेद उपनिषदे  भागवत आदी अठरा पुराणे व  गीता अन् संत वांग्मय गद्य-पद्य -कथा, ...

मांडली शब्दांची आरास -शारदा स्तवन

इमेज
 श्री गणेश प्रसन्न  श्री शारदा देवी प्रसन्न  मांडली शब्दांची आरास   तव पूजेस्तव,     होऊनी सर्व संत कवीगण उपस्थित  शब्द हेचि भाव शब्द हेचि गंध शब्द हेचि फुले    शब्दांचाच घंटानाद शब्दांचेच निरांजन तुला ओवाळण्या एक पूजा अशीही की प्रसाद प्रथम अन पूजा नंतर  साधन अन् साध्य यात नुरले अंतर अशीच शब्द पूजा  शब्द माला अखंड बांधितो  आनंदात राहतो  मी तुझिया कृपेने ध्यानी सदा सोज्वळ रूप  नित्य देती स्फुरण अगणित असती कर   दिसती चार झंकारती वीणा मांडीवरी दोन  एक करी ग्रंथ एक करी अक्षमाला  फुलवून पिसारा मयूर सहज सहर्ष संगतीला  साहित्य शास्त्र संगीत ६४ कला यात सदा वास विहार स्मरता तुला सत्वर  जायी जडता मती    उमजे ज्ञान मिळे गती  देव तिन्ही तुला वंदिति  ओंकारी तू अर्धचंद्र बिंदूत वसती  सारे संत रचती कवन गाती  रुपगुण स्तुती  अखंड अगाध अक्षय पात्र वर्णू तुझा किती महिमा शब्दा शब्दात भरून  राहिलीस तरीही तू उरून जन्मले हे काव्य  शारदे हा तुझा प्...

डायरी...

इमेज
नववर्ष लेवुनी आले  ३६५  दिवसाची  पाने  सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेली बांधणी  माहित आहेत रंग  काही धाग्यांचे  काही मात्र गुलदस्त्यात ... संकल्पांचा बुकमार्क  प्रौढत्वी निज शैशवास जपणे, सत्पात्री यथाशक्ती दानधर्म, काय वाचा मनोभावे  सदा घडो सत्कर्म   व्यायाम अन नामस्मरण  यांसी ज्यादा गुणांक तेची आहे जीवनमर्म  राहीन सावधान घेईन रोज आढावा झोपी जाण्याआधी   मिळाले किती गुण कळण्या गुणमापनपट्टी  करि   उजळणी पानोपानी वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा  राम गावा राम ध्यावा ।  राम जीवींचा विसावा  - नंदकिशोर लेले.

जीवनरंग...

इमेज
✍️ त्याने निसर्ग कविता हिरव्या रंगानं लिहिल्या .. प्रेम कविता गुलाबी .. दुःखद अनुभव काव्य लाल, करड्या अन् सरड्या रंगानं  आता मात्र तो साऱ्या कविता फक्त निळ्या रंगानं लिहितो .... कारण  नदी खाली असते सागरास मिळते .... आकाश वर असते सर्वांना सामावून घेते ... ते निळा रंग धारण करतात. प्रवाही राहणं हेच जीवन हे आता त्याला उमजलंय.

ऋतसंहार

इमेज
  वरील काव्य श्री देशमाने काका यांचे मित्र प्रसिद्ध कवी श्रीयुत सदानंद डबीर यांनी रचलं आहे..  काव्य उत्तमच आहे . हे काव्य वाचून आणि चित्र बघून मला काव्य सुचले.... ऋतसंहार ११ .१०.२०२३.    तुझं नयन दल,   गालावरील खळी,  शुभ्र दंतपंक्ती,  चाफेकळी नाक लाल ओष्टकमल  आणि  मोहक केशसंभार हाच सारा ऋतुसंहार   जेंव्हा असतीस तु जवळपास  पाहून तुझी रम्य अदा ऋतू बहरतात सत्वर सदा खास कवित्व ऋतूसाठी नच अडे   नसे आमुचें प्रेम नुसते बोलघेवडे https://www.mahamtb.com/Encyc/2024/7/6/mahakavi-kalidas.html या लेखातून उधृत.... ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्यही कालिदासाची प्रथम रचना. ‘संहार’ या शब्दाचा अर्थ येथे विध्वंस करणे किंवा नाश करणे, असा नसून संचय करणे, एकत्रित करणे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. कालिदासाने लिहिलेले ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्य म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगणार्‍या ऋतुवर्णनाचा संग्रह होय. या काव्यात सहा सर्ग आहेत. त्यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रत्येक सर्गात १६ ते २८ श्लोक असे त्याचे सुयोग्य विभाजन. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसील...

रम्य ते बालपण.....

इमेज
आज बालदिन आई लहानपणी पेरू, लहान आंबट गोड बोरं, काशी बोरं कवठ फळ , आंब्याच्या दिवसात रायवळ आंबे, भुईमूग शेंगा ऋतुनुसार अशी फळे आपणा सर्वांना खायला देत असे. ही फळे देताना विशेषतः जी फळे मर्यादित असत त्यांच्या बाबतीत वाटा करून दिला जाई आणि त्यामध्ये मग भावंडांमध्ये थोडीफार कुरबुर होत असे त्यात एक वेगळीच मजा असे. विशेषतः कवठ आणि गुळ एकत्र असा खाऊ याचा वाटा आपल्याला आहे तो खाऊन झाल्यावर भावंडांच्या वाट्यात लक्ष घालून मला थोडेसे दे अशी लाडीगोडी लावली जात असे आणि मग भाऊही थोडासा त्यातला आपल्याला देत असे. अशा या लहानपणीच्या गमती जमती काही मधुर तर काही आंबट गोड बाळ जीभ जागवणाऱ्या आणि स्मृती पटलावर उमटलेल्या. त्याची आठवण प्रकर्षाने झाली आणि मग एक काव्य उमलले ते असे. 🎶🎶 बाल दिनानिमित्त बालपणात घेऊन जाणारी आत्ताच सुचलेली कविता..  *रम्य ते बालपण*  कधीच संपू नये असे..  स्मृती त्या आईने विळीवर चिरून दिलेल्या  पेरूच्या, कवठ गुळाच्या, राय अवळे,गावठी आवळे, आंबट गोड बोरं,  काशीबोरे , कैरी चिंच मिटक्या मारत खायच्या , चोखून खायच्या रायवळ आंब्याच्या....  पापड लाट्या गट्टम् क...

ध्यासपंथी गोखले काकू

इमेज
ध्यासपंथी गोखले काकू  माधवी नाम लेवून,  सदा हसतमुख राहून सहज मधूर लाघव  संवाद   साधीला आपण ... बहुधा बोल तर कधी अबोल राहून पाठीवरी आश्वासक थाप दिली आपण ... आम्हा सर्वां चिरंतन मधूकोशी धाग्यात गुंफले आपण...   अक्षर योगी आपण , साहित्य प्रेमी आपण,  शब्दमोल जाणून स्पष्ट शब्दोच्चार करीत केले विविध अभिवाचन आपण ... साक्षेप समर्थांचा" हे अभिवाचन अधिक ठसले ,बिंबले आमच्या मनी हृदयी  अबालवृद्ध यावरी अपार संस्कार केले आपण... २६ जानेवारी १५ ऑगस्ट असता उत्साह ओसंडित प्रोत्साहित केले आपण... अहो वर्तनातून देव देश धर्म याचे मर्म सांगीतले आपण.... गीताप्रेमी कर्मयोगी आपण... संस्कृत पठण विविध श्लोक सुभाषिते शिकवत शहाणे केलें आम्हा आपण ...  देहभोग सोशिले परि उच्चार त्यांचा न केला आपण... रसरशीत जीवन जगला आपण... कार्यसुगंध दरवळे म्हणूनी  काव्य रचण्या शब्द सारे आले धावून ... समर्थ रामदास रचित पावन भिक्षा श्लोक (कोमल वाचा दे रे राम....१२ श्लोक ) सारे गुण  अंगीकारले आपण अन् इंदिरा एकादशीचा योग साधून आम्हा अंतर्मुख करित पारखे केले आपण..   ...

मन हो रामरंगि रंगले...

इमेज
मन हो रामरंगि रंगले  रामरंगि रंगले मन  आत्मरंगी रंगले मन विश्वरंगि रंगले  चरणि नेत्र गुंतले  भृंग अंबुजांतले  भवतरंग भंगले    अंतरंग दंगले   प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या नगरीमध्ये गुढ्या तोरणे उभारून स्वागत करण्यात आले हा दिन म्हणजे गुढीपाडवा. त्या अगोदर असतो तो रंगोत्सव. काही दिवसापूर्वीच रंगोत्सवानिमित्त विविध माध्यमातून रंगाचा उल्लेख असलेली गाणी ऐकू येत होती परंतु जे गाणं कुठेही ऐकायला मिळालं नाही पण मनामध्ये सारखं रुंजी घालू लागले ते गाणं म्हणजे मन हो राम रंगी रंगले. स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांनी गायलेले हे अतिशय भावपूर्ण गाणं आहे. प्रथम मला हा अभंग आहे असं वाटत होतं. परंतु ही भक्तीरचना' आठवणीतल्या गाणी' या संकेतस्थळावर शोध घेतला असता प्रतिभावंत संगीतकार श्री गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली व स्वतः त्यांचीच ही काव्य गीत रचना हे कळलं. रंग या विविध शब्दांचा उल्लेख असलेले विविध शब्द या गीतात अतिशय समर्पकरीत्या योजिलेले आहेत. त्याने मनावर अनेक वर्ष पकड घेतलेली आहे. मात्र आज हे गीत आकळलं . या गीताचे रसग्रहण करावं असं वाटलं ते खाली देत...

सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण

इमेज
 सुहास्य तुझे मनास मोही- रसग्रहण  जसे  फुल फुलताना दिसत नाही तसच प्रेम हे कसं फुलतं हे कळत नाही .पहिली दृष्टादुष्ष्ट- नजरा नजर हीच सुरुवात  शुभंकर  गाठ बांधते.जसे झाडांवर पहिल्यांदा कोवळी पालवी येते नंतर त्यातून फांदी दिसायला लागते त्याला पाने लागतात नंतर कळी येते फुल येते फळं येतात. प्रेमिकांच्या कधी सारख्या  गाठीभेटी होतात तर कधी क्वचित परंतु या प्रत्येक भेटीतला आनंद  प्रिया  व प्रियकर साठवत जातात. अशाच एका क्षणीक भेटीतील प्रेमभाव या गीतातून  प्रियकर व्यक्त करीत आहे. म्हणत आहे की  तुझे हास्य किती लोभस आहे सुरा अर्थात मद्य जरी जवळ असले तरी त्याला दूर करून मी तुलाच जवळ करीन .वास्तविक इथे तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध झाला असून ते सौंदर्य हसताना अधिक खुलते आणि मद्यपान केल्यावर जसा माणूस हळूहळू धुंद होतो तशी धुंदी या प्रेमिकाला चढली आहे. गीताच्या दुसऱ्या कडव्यात तुझे लोचन -नयन हे मोहक आहेत आणि तू हसताना ते अधिक मोहक दिसतात जणू चंद्राचा प्रकाश त्यात विलसत आहे असाच भास होतो. आणि त्यामुळेच चंद्रिका म्हणजेच चांदण्या ही तुझ्या नयनावर लुब्ध झालेल्य...

गुंगारा ....

इमेज
 गुंगारा..... पहाटेच दारावर  कुणीतरी   टकटक केलं.     मी पिन होलमधून बघितलं  ..दुरून आवाज आला. ढग नुसते येतायत.. जातायत   पावसाचा पत्ता मिळेल का हो..? मी दार नाही उघडलं..  म्हटलं .. तुम्हाला *ढग* म्हण्यायच की  *ठग*

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

इमेज
'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा 'हे ज्येष्ठ गायिका माणिकताई वर्मा यांनी गायलेले गीत लहानपणापासून आपण प्रत्येक जण आकाशवाणीवरून पहाटेच्या वेळी भक्ती संगीत या कार्यक्रमात ऐकत आलो आहोत. हे काव्य ' केशव 'नामक रामभक्ताने रचले असून संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केले आहे.गीताचे शब्दच चाल घेऊन येतात असं म्हटलं जातं . प्रतिभावंत संगीतकार यांनी संगीत दिलेली गीते ऐकल्यानंतर याचे आपणास नेहमीच प्रत्यंतर येते . हे गीत 'यमन 'रागामध्ये असून माणिक ताईंनी अतिशय भाव उत्कटतेने सादर केले आहे. या गीताचे सुरुवातीचे संगीत आणि माणिक ताई यांचा त्यानंतर येणारा शब्द उच्चार याने माझ्या मनावर गेली अनेक वर्ष पकड घेतली आहे. या गीताचे रसग्रहण करावे असे गेले वर्षभर माझ्या मनात आहे. आज रामनवमी असल्याने ते कागदावर उतरून पूर्णत्वास जात आहे. घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा दृषा तीच पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा अंबुजदल नयना मुनी मानस विहारा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा प्रेम चित्ता सौख्य सिंधू दशरथ कुलदीपा मास दास भ्रात नाथ तूच एक पाही केशव म्हणे ...