पोस्ट्स

गुंगारा ....

इमेज
 गुंगारा..... पहाटेच दारावर  कुणीतरी   टकटक केलं.     मी पिन होलमधून बघितलं  ..दुरून आवाज आला. ढग नुसते येतायत.. जातायत   पावसाचा पत्ता मिळेल का हो..? मी दार नाही उघडलं..  म्हटलं .. तुम्हाला *ढग* म्हण्यायच की  *ठग*

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

इमेज
'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा 'हे ज्येष्ठ गायिका माणिकताई वर्मा यांनी गायलेले गीत लहानपणापासून आपण प्रत्येक जण आकाशवाणीवरून पहाटेच्या वेळी भक्ती संगीत या कार्यक्रमात ऐकत आलो आहोत. हे काव्य ' केशव 'नामक रामभक्ताने रचले असून संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केले आहे.गीताचे शब्दच चाल घेऊन येतात असं म्हटलं जातं . प्रतिभावंत संगीतकार यांनी संगीत दिलेली गीते ऐकल्यानंतर याचे आपणास नेहमीच प्रत्यंतर येते . हे गीत 'यमन 'रागामध्ये असून माणिक ताईंनी अतिशय भाव उत्कटतेने सादर केले आहे. या गीताचे सुरुवातीचे संगीत आणि माणिक ताई यांचा त्यानंतर येणारा शब्द उच्चार याने माझ्या मनावर गेली अनेक वर्ष पकड घेतली आहे. या गीताचे रसग्रहण करावे असे गेले वर्षभर माझ्या मनात आहे. आज रामनवमी असल्याने ते कागदावर उतरून पूर्णत्वास जात आहे. घडी घडी घडी चरण तुझे आठवते रामा आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा दृषा तीच पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा अंबुजदल नयना मुनी मानस विहारा सर्वसाक्षी सर्वोत्तम सर्व गुरुरूपा प्रेम चित्ता सौख्य सिंधू दशरथ कुलदीपा मास दास भ्रात नाथ तूच एक पाही केशव म्हणे ...

कविता - मेरी जीवनसखी

 कविता - मेरी जीवनसखी जीवन की बगिया में टहलते हुए  उसने मेरा हात कब पकड लिया  नही पता चला  कहा से आयी वो  परछाई जैसे मुझपर छा गयी   पर सचमुचमे तो पर परछाई   नही निकली  करपडी संवाद सुबह शाम दिन रात  बोली जो रिश्ता  दिन का सूरज से  रात का चांदनी से  बादल का बारिश से  सावन का झुलेसे  नदी का सागर से  नैया का नदी से  साज का सरगम से  राग का बंदिश से  फुल का सुगंध से  पंछी का चहचहाट से  विहंग का गगन से  बचपन का कहानी से  चेहरे का आईने से  कलम का कागज से  और कन्हैया का बासुरी से  वही रिश्ता हैं मेरा तुझसे  राम प्रहर मे बोली  तू गाता चल गुन गुनाता चल  मै गीत बनकर साथ दूंगी  तेरा निरंतर   - नंदकिशोर लेले

आण मराठीची

इमेज
  आण मराठीची मराठी असे आमुची मायबोली संत कवीगण साहित्यिक फुलवती तिच्या वैभवाचा मळा दाविती शारदीय चंद्रक ळा ज्ञानोबा म्हणती शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकोबा म्हणती आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने  रामदास म्हणती प्रसंगी अखंडित वाचीत जावे  दिसा माझी काहीतरी लिहीत जावे वाचू नित्य संत साहित्य, शिवबा वीर गाथा ,विविध वांग्मय  उमगण्या तिची मोहक शब्दकळा सहजची मग लागेल तिचा लळा जागवील ती विवेक , मिळेल स्फूर्ती महती मातृभाषेची उतरेल नव्या पिढीच्या गळा वाचू बोलू लिहू नित्य मराठी राहील मग ती सदा आपुल्या ओठी कधी न लागेल तिला ओहोटी आण आज ही घेऊया समृद्धी...वैभवाची ती खाण आहे किती खोल जाणूया.... संस्कृत भाषा ही जननी साऱ्या भारतीय भाषा तिच्या भगिनी मान ठेऊ साऱ्या भाषांचा भाळी जरी टिळा मराठीचा !

रवीअस्त.....

इमेज
 रवीअस्त मोहितो आम्हां   उठती उदगार अहा....हा  डोळ्यांचे पारणे फेडतो हरदिन हरघडी हर स्थळी रूप नित्य नूतन शशी स्वागता सहज सोडतो सिंहासन    सांगतो संपता कार्यभाग सोडा हे जग आसन सत्वर नका ही थांबू क्षणभर न धरा वृथा अभिमान केल्या कार्याचा.. याहून विरळा काय असे हा निष्काम कर्मयोग भगवद् गीतेचा  दिनभर दिले काम करा नीट     उद्याचा दिवस जाईल नीट  प्रेयसां परि श्रेयस श्रेष्ठ दावितो तो वाट नमितो नंदकिशोर रवी अस्त समयी शशी उदय होईल आता पश्चिमेवरी 

निवडणुकीच्या उंबरठ्यावर....

इमेज
निवडणुकीच्या उंबरठ्यावर.... कुणी निंदा अथवा वंदा टोपी घालणं आणि बदलणं हाच आमचा धंदा घडलं काही विपरीत  की एकमेकांकडे दाखवणं बोटं हीच आमची रीत  तुम्ही बसता बोटं मोडत आम्ही असतो पत्रकारांपुढे बाता झोडत....  सेटिंग कोण कोणाचं करतं ज्याचं त्याला माहीत असतं  समजता का आम्हाला वेडे ... खुळे ... वाटतं तुम्हा चॅनलवरलं आणि पेपर मधलं सारं खरं समजून चालत असतो आम्ही ..छे छे. शाळेत शिकवलं होतं गणितामध्ये अगोदर असतो पक्ष आणि मग असतं साध्य इथे मात्र अगदी उलट राजकारणाच्या गणितात आधी असतं साध्य आणि मग असतो पक्ष आल्या निवडणुका की उत्तम प्रशासन, महिला आणि बाल कल्याण, बळीराजा आदि साऱ्या वर्गाची काळजी ज्येष्ठांसाठी सवलती आणि मोफत बरच काही असं लिहिता जाहीरनाम्यात. पाच वर्षाचा वायदा (बाजार) बहुमोल मत द्याना यंदा  करून देऊ तुमचा फायदाच फायदा ..... टोपी बदलणे हाच आमचा धंदा कायद्यातून पळवाटा काढणं हाच आमचा वायदा.  ओठावर गोड भाषा चेहऱ्यावर लावून फेशियल आणता चेरी हसू ,  कसं.... कसं.... एकदा दिलं ना मत  मग वागू पूछो मत असं  रंग बदलणारे सरडे आणि ...

विवाह सोहळा निनाद

इमेज
माझा जिवलग मित्र विनय  वसंतगडकर याचे मुलाचा विवाह सोहळा छायाचित्र   लागताच हळदीचे रंग   पल्लवती चित्तवृत्ती  उमटती सहज मोहक भाव  मुख कमलावरती  नवपरिणीत जोडी नातं  जन्म जन्मांतरीचं म्हणून पडली गाठ   पाऊलं जपून चालून सात दृढनिश्चिय करती  खात्री विश्वास देती एकमेकां  आता जीवनभरची साथ अभंग.

आकाशीचा अदभूत दिवा.....

इमेज
  (भोपाळ येथील कलियासोत  जलाशय  दिवाळी नोव्हेंबर १३,२०२३   फोटो सौजन्य  शालेय बालमित्र श्री सुनील भिडे सोलापूर) आकाशीचा अदभूत  दिवा... दिपावली प्रकाश पर्व  रविअस्तचली  किती  हे मोहक  भाव साठवले ते उरी अंतरी परि  अपुरे दोन नयन टिपलं छायाचित्र म्हणून  जलाशयी निर्मळ स्वभाव  म्हणून उमटतसे रवि बिंब प्रतिबिंब  म्हणती  सूर्य देव  जलाशया सहन केलास  तू दिनभर माझा तापभार   थांब आता क्षणभर येत आहे शशी लवकर  घेवून शितलभाव   तापत्रय ते तपत्रय हा तुझा प्रवास पाहिला मी जवळूनी  तुझे हे अपार सायास  या कारणे दिला हा प्रसाद   वाट हा सर्वाना तुझा मोद.  सांगतसे हे प्रतिबिंब निसर्गाप्रती ठेवा कृतज्ञ भाव नका ठेवू वृथा गर्व  सर्व ठिकाणी श्रेय घेण्या मीच प्रथम

पोपट दादा ...पोपट दादा ...

इमेज
  पोपट दादा ... पोपट दादा... झोकात असता तुम्ही सदा हिरवा अंगरखा लाल चोच  डौल तुमचा किती छान ! आहात किती दिमाखात  बोटं घातली आम्हीं तोंडात शहाणें तुम्ही फार सोलताय दाणा तुकवत चोच अन मान हरपून गेलं आमचं भान करून खटपट खाताय कणीस किती पटपट   रांगेत बसलेत सवंगडी पहात वाट आहे खात्री तयांना  खाणार नाही तुम्ही कणीस पूर्ण ,           देती असे क्षण  आम्हां             श्रद्धा सबूरी शिकवण  आहात किती तुम्ही गोड गोड येणार ना... रोज रोज... आम्हाला लागली तुमची ओढ आम्हाला लागली तुमची ओढ....