पोस्ट्स

आदिमाता

  //श्री सरस्वती प्रसन्न// आदिमाता ठाई ठाई तुझे दिव्य रूप तू सृजनशक्ती , तू अखंड संजीवक, ऐश्वर्य समृद्धी वरदायिनी, तू शक्तिदायी तू बुद्धिदेवता तू प्रेरक ,तू तारक, तू दयाळू कृपाळू जनांसी आधारु तू दुर्गा तू भगवती तू योगेश्वरी चामुंडा चंडिका तू शाकंभरी तुळजाभवानी तू रेणुका सप्तशृंगी तू महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ,तू वैष्णव देवी, तू गावदेवी, चतुर्श्रुंगी, असशी घरोघरी तू अन्नपूर्णा अनंत अगाध रुप महिमा वर्णती सारे कवीगण संतजन परी आहेस खरोखरी तू आदिमाता जगतजननी प्रकृती व पुरुष यातील प्रकृती येता नवरात्रोत्सव हर्षती आनंदती सारे भक्तजन , होता आगमन ,सळसळे उत्साह दाही दिशातूनी मंगल वार्ता कानी पडे, विशेष संतोष पावती माता-भगिनी व्रतस्थ राहती भक्तजन ,उपासती तुज नानाविध अंगी आस तुझ्या दर्शनाची तासन तास उभे राहती रांगेतूनी अनुसरूनी कुलाचार प्रथा-परंपरा घरोघरी अन राउळी षोडपचार पूजा रूप कांती उजळती झेंडू शेवंती माला अन अखंड रात्रंदिन प्र्ज्वले समई नंदादीप सप्तशती पूजा पाठ, श्रीसूक्त, देवी,भागवत देवी स्तुती गजर तुझ्या नामाचा ओठी हर एक प्रहरी नवरात्र पुरवी ऊर्जा वर्षभरी,...

दीपज्योती नमोस्तुते !

इमेज
  //श्री सरस्वती प्रसन्न// दीपज्योती नमोस्तुते ! आज दिव्याची अमावस्या आहे. घरोघरी दीपाचे पूजन केले जाते. ज्या दीपाने परमेश्वरास ओवाळले जाते त्याचीच आज पूजा. हाच आपल्या संस्कृतीचा महिमा आहे. प्रत्येक प्राणीमात्रातील व वस्तूतील प्राणशक्ती तत्व एकच आहे ;फक्त आविष्करण वेगळं. जे तत्त्व लहानशा पणतीच्या ज्योतीत आहे तेच तत्व विविध प्रकारच्या दिव्यांमध्ये प्रगट होतं. आधुनिक वाल्मिकी गदिमांनी त्यालाच ज्योतीने तेजाची आरती असं म्हणलं आहे. गंमत अशी की सगुणातील पूजा दृश्य स्वरूपातील आहे आणि मिळणारं समाधान मात्र अदृश्य तरी जाणवणारे आहे. गेले चार-पाच दिवस माझी ती.आई दीप पूजनाच्या तयारीत गुंग होती. तिच्यातील आर्तभाव माझ्यात परावर्तित झाला होता. पूजा उत्तम पणे पार पडली. तिला आणि मला खूप समाधान लाभलं ते तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं . यातूनच पूजा झाल्यावर खालील काव्य स्फुरले ते सादर करत आहे. दीपज्योती नमोस्तुते !   प्रार्थना                 नित्य उजळू दे अंतरीचा दीप... ओतूनीया...

नामस्मरण

क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य

इमेज
  श्री सरस्वती देवी प्रसन्न क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य यांची स्वाक्षरी घेण्याचा साहित्य वाचनाच्या छंदामुळे अनेक मान्यवर साहित्यिक मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचे, त्यांना ऐकण्याचे योग माझ्या आयुष्यात येत गेले. असाच एक योग म्हणजे बँकेमध्ये  २००६  साली वाशी- नवी मुंबई मध्ये नोकरीस असताना कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित  कवी "बी - ( श्री नारायण मुरलीधर गुप्ते )"  यांच्या कवितांच्यावरील एका विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राह्यचं भाग्य मला लाभलं.  श्री शंकर वैद्य हे  कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी  होते. कार्यक्रमात  नामवंत कवी अरुण म्हात्रे, सतीश केळुसकर अशोक बागवे आदी मंडळीचा सहभाग होता. कवी बी यांच्या अनेक उत्तम  कविता- चांफा   बोलेना  चांफा   चालेना …  चांफा या अत्यंत गाजलेल्या कवितेसह  माझी कन्या,   गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या आदी  कवितांचा  वाचनात समावेश होता असं आठवतं .   त्या कवितांची गुण वैशिष्ट्ये ही  सांगितली गेल्याने...

मनमोर ....

इमेज
  मनमोर .... सकाळचे सात वाजले होते आजी आजोबा हॉलमध्ये चहा पीत बसले होते. आजोबांचा चहा झाला आणि ते पटकन उठले आणि कॅलेंडरचं पान बदलून जून महिना आणला.... आजी: किती उकडतय ना... आजी पुटपुटली आजोबा :काल पाऊस पडला की आजी: वळवाचा पाऊस होता तो ...पावसाळा ७ जूनलाच सुरु होतो आजोबा: अग ऋतुचक्र बदलय सारं ..... आजी: यावर्षी पाऊस नॉर्मल आहे बरं का ....कालच बातम्यात सांगितलं आजी-आजोबांचा संवाद सुरू होता तेवढ्यात ' नाच रे मोरा आंब्याच्या वनात' रेडीओवर गाणं लागलं ... सुहास ते ऐकण्यात तल्लीन झाला होता आणि चहाचा घोट घेणं सुरू होतं एवढ्यात छोटी मनू उठून आजीला येऊन बिलगली ... म्हणाली... आजी गं या वर्षी तरी तु मोर दाखवणार ना नक्की खराखुरा... मोबाईल मधला नकोय मला... आजी: हो ग मने.. नक्की दाखवणार. मोराच्या चिंचोलीला घेऊन जाणार आहे मी तुला...आजीने प्रश्नार्थक चेहऱ्याने आजोबांकडे पाहिलं. आजोबा उठले.. . पटकन मोठा पांढरा कागद आणि पेन्सिल घेऊन आले आणि सुंदर नाचणाऱ्या मोर लांडोर जोडीचं चित्र काढलं ...मनू पटकन रंगीबेरंगी पेस्टल कलर घेऊन आली आणि मोराचा पिसारा हा हा म्ह...

झरोका....

इमेज
परवा मला एक मित्र म्हणाला कशी असते प्रेम कविता मी त्याला म्हटलं कवितेनं माझ्यावर प्रेम केलं , फिदा आहे ती माझ्यावर माझा दिवस जातो आनंदात तरीपण तू म्हणतोच आहेस तर ऐकवतो थोडंस. शाळेत असती ती कैरीच्या फोडी सारखी , लाल हिरवी बोरांसारखी सारखी आंबट-गोड, राय आवळ्यासारखी तुरट, लाल लाल बदाम गोड झाडा वर दगड मारून पाडणारी, दप्तर पाठीवर अडकून गळ्यात गळ्यात घालून चालणारी एकमेकाची खोडी काढणारी , म्हातारीच्या झाड्वरील कणसं काढून पिसं हवेत उडवणारी, रावळगाव चॉकलेट , चिंगम चघळणारी अगदी निरागस तर दहावी अकरावीत तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यातून नजरानजर आणि जिन्यावरून जाता-येता , ट्युशनला जाताना सहवास वाढवायचा प्रयत्न करणारी थोडी भाबडीच , कॉलेजमध्ये मात्र जरा समजून उमजून वही पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी, वाढदिवस निमित काढून भेट वस्तू देत घेत, कॅन्टीन मध्ये भेटणारी ट्रीपच्या आठवणीत रमणारी.. क्याडबरी सारखी.. तर पुढे पदवीनंतर ही स्टोरी फारच क्वचित पूढे सरकते... नवीन वाटा फुटतात उच्च शिक्षण घेत असताना,सुरवातीचं अर्थार्जन करताना नदीकिनारी पाण्यात पाय टाकून बसणारं समंजस अशीही वाहत...

शब्द कळ्यांचे फुलणे......

kalakar शब्द कळ्यांचे फुलणे...... अनुभवाच्या मळ्यात शब्दकळ्या फुलतात हर्ष विषाद  घात- प्रत्याघात , सुख-दुःखं हेच तयांचे बीज खत- पाणी घालतात माय बाप रसिक शब्दकळ्या होताच फूल उलगडती विविध रंग काही मनभावन तर काही जीवघेणे... पहाता अंतरंगी ज्याने हवा तो घ्यावा गंध न कोमेजणे न सुकणे सदा  उमलणे व फुलणे हाच त्यांचा जीवनधर्म या मळयाचे  मालक असती संत  व  कविजन !

आठवणींचां गुलमोहर ....

इमेज
आठवणींचां गुलमोहर .... ढग दाटून येतात तशाच आठवणीही.... ढग दाटले की बरसतो पाऊस .. आठवणी दाटल्या की बरसतात अश्रू.. कधी घेऊन येतात त्या बासरीचा मंजुळ स्वर तर कधी व्हायोलिनचे आर्त सूर.. अन करतात अंतर्मुख... आठवणींचे पक्षी हलकेच येऊन बसतात खांद्यावर आणि होऊन जातो आपण आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार... मोकळं मोकळं वाटतं झाल्यावर पायउतार जसा पाऊस पडून गेल्यावर लख्ख होतं आभाळ मोहरतो क्षण अन देऊन जातो दिवसभराची संजीवनी आठवणी असतात आई-वडिलांच्या ,कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या आठवणी असतात बालपणीच्या ,तारुण्याच्या , प्रौढपणाच्या आणि पिकल्या पानाच्या आठवणी असतात शाळा-कॉलेजातील शिक्षकांच्या, जिवलग मित्रांच्या, नोकरी व्यवसायातील जिवलग सहकाऱ्यांच्या आठवणी असतात गावाकडील वास्तूच्या, आवडलेल्या पुस्तकांच्या , ऐकलेल्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानाच्या गाण्यांच्या मैफिलीच्या ,पाहिलेल्या अजरामर सिनेमा नाटकांच्या ... कधी बंदिस्त करतो कॅमेरा क्षण आठवणींचे तर काही क्षण होतातच हृदयस्थ ... जशी प्रतिभावंतांची भेट सत्पुरुषांचे दर्शन निसर्गानुभूती आणि आडवळणावर भेटलेली माणुसकी ...

फिरत्या चाकावरती...

इमेज
श्री शारदा माता प्रसन्न फिरत्या चाकावरती... शिवरात्र झाली थंडी संपत जाते आणि मार्च महिना उन्हाळा ऋतु बदल जाणवू लागतो . आपले पाणी पिण्याचे प्रमाण वाढू लागते. जरी फ्रिज असला तरी माठातील/ डेऱ्यातील गार पाणी पिण्याचे समाधान काही औरच. घरी नवीन माठ आणायला हवा असा सूर निघू लागला आणि संध्याकाळी मी व आमचे शेजारी बापूकाका माठ आणण्यास चालतच बाहेर पडलो. चालता चालता डेरा महात्म्य वर्णन सुरू झाले. सोलापूरकडे माठाला डेरा म्हणतात. या मातीच्या घड्याचे अनेक प्रकार आहेत-अगदी संक्रांतीची सुगडी, बोळकी ,दह्यासाठी वापरली जाणारी गाडगी, लाल अथवा काळ्या मातीचे माठ ,रांजण, कुंभ वगैरे .यात आणखीन एक प्रकार म्हणजे महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून येणारे विविध घाटाचे माठ तोटीचे चे अगर बिनतोटीचे इत्यादी. ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे तिथे माठातील पाणी हे पुरवणीस येणारे व समान गार पडत असलेने आरोग्यदृष्ट्याही हितकारक असल्याने त्याचा वापर हा होतोच. शेतावर तसेच वाड्यावस्त्यावर, गावाकडील बस थांबे रेल्वेस्टेशन्स इत्यादी ठिकाणी माठ/ लाल कापड लावलेले रांजण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची तहान भागवतात आणि अशी पाणीपुरवठा से...