पोस्ट्स

बीजगीत

//सरस्वती देवी प्रसन्न // बीजगीत  आपण  दैनंदिन जीवनात  सर्वसाधारणपणे असं बघतो की एकीकडे अमाप मुबलकता आहे   मग ती साधन संपत्तीची  (उदा -जमीन,घराची जागा ,पाणी ,वाहन )  अथवा रिकामा  वेळ  आणि यातून  चैन ,सुखलोलुपता  आणि  अंतिमतः उन्मादाकडे वाटचाल सुरु आहे.  तर  एकीकडे यापासून वंचित असा समाज आहे .   विसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीस अनेक सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विसंगतीतील संगती अशी की साऱ्या  नव्या पिढीस  आपल्या घरची आर्थिक स्थिती  काहीही असो सर्व प्रकारची आधुनिक  वाहनं  व Gadgets वापरण्यास हवी असतात. बदलती कुटुंब व्यवस्था  Nuclear Family  आणि  परिणाम म्हणून मिळालेलं अनिर्बंध स्वातंत्र्य यातून नवीन पिढीस लहान मुलांना सहजचं हाती सर्व काही फारसं काही  शारीरीक वा मानसिक  न कष्ट पडता  मिळू लागलं आहे .  आधुनिक Gadgets चा वापर कसा करावयाचा याचं भान  हे  सारेच जण श्रीमंत कुटूंबातील अ...

डायरी

इमेज
डायरी नववर्ष लेवुनी आले ३६५ दिवसाची पाने सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेली बांधणी माहित आहेत रंग काही धाग्यांचे काही मात्र गुलदस्त्यात .... संकल्पांचा बुकमार्क घेईल नव्याचे नऊ दिवस होणार नाहीत याची काळजी प्रौढत्वी निज शैशवास जपणे , सत्पात्री यथाशक्ती दानधर्म काय वाचा मनोभावे सदा घडो सत्कर्म दिले आहेत गुणांक ज्यादा व्यायाम आणि नामस्मरण यांस कारण तेच आहे जीवनमर्म घेईन रोज आढावा झोपी जाण्याआधी मिळाले किती गुण कळण्या गुण मापनपट्टी करी उजळणी पानोपानी दूर ठेवीन संकल्प विकल्पास जागवून सत्प्रवृत्ती हरदिनी वर्षाअखेरीस मांडीन ताळेबंद सत्कर्माचे भांडवल देईल उत्तम परतावा राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसावा .

लेखणीचा प्रवास...

लेखणीचा प्रवास... बालपणी सलगी पाटी वरील- पांढऱ्या ठिसूळ पेन्सिलशी क्षणात विसरी काही, क्षणात नवीन हवे काही, निरागसच सर्व काही षड्रिपूशी सलगी नाही... आणि जाता वरच्या इ यत्तेत हाती षटकोनी पेन्सिल आणि वही टोक मुंड होता खूर (Sharpner) येई कामी, सोलता वर्तुळाकार टरफले वाटे मजा भारी खोडण्या काही चूक आता हाती सुगंधी खोडरबर पण चढत जाता वरची इयत्ता येई हाती शाईपेन सांडता शाई मदत करी टीपकागद पण चूक होता पुसून टाकणे पडे भारी , खूण चूकीची राही पानी भाग्य सारं बदलत जाई हाती पडी बॉल पेन आता चूक पुसणे होई महाकठीण साठी वय होता कळे,उमगे अरे काया वाचा मन हीच तर पेनं होती सारी हा तर प्रवास झाला होऊन सलगी षड्रिपूशी मीच लिहून ठेवी पुनर्जन्माची ललाट रेषा ही तर मानव जन्मा तुझी कहाणी म्हणून आता आठवी तुक्याचा अभंग लहाणपण देगा देवा,मुंगी साखर रवा.

आकाश पांघरुनी.....हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २

हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक २ आकाश पांघरुनी..... १९९७-९८ साल असावे नोकरीनिमित्त मी साताऱ्याला होतो ; दैनिक ऐक्य मध्ये रमेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे येत असत. थंडी सुरू झाली आणि तीचा जोर वाढत चालला की मला नेहमी मंगेश तेंडुलकर यांच्या एका व्यंगचित्राची आठवण होते. व्यंगचित्रात वर्णन केलेला प्रसंग असा आहे -'मुंबई महाबळेश्वर लाल एसटी बस शिरवळ थांब्यावर थांबली आहे आणि दोघं प्रवासी महाबळेश्वरला थंडी कशी आहे याची चर्चा करत आहेत आणि त्याला एका प्रवाशांकडून उत्तर मिळतं- 'काय ईचारू नका निस्त नाव काढलं तरी घाम फुटतुया !' थंडी आणि पांघरूण यांचं अतूट नातं आहे. तसं पाहिलं तर पांघरूण तर आपण दररोज वापरतोच परंतु इतर ऋतू पेक्षा हिवाळ्यात त्याची संरक्षणासाठी जास्त गरज असते जेणेकरून उब निर्माण झाल्याने झोप शांत लागते. पांघरूण प्रकारही विविध आढळतात जसे सोलापुरी चादर, पंढरपुरी घोंगडी .कांबळ, कापसाच्या जयपुरी दुलया, दोहर,जुन्या कापडांच्या वाकळ ,गोधड्या, वुलनच्या शाली ,ब्लांकेट्स इत्यादी. हवामानाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि व्यक्तीची प्रकृती यानुसार याचा वापर होत असतो. हा ...

थोडंसं हलकं होऊया...हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक १

इमेज
नववर्षात ' हलकंफूलकं ' या सदरातून आपल्याशी संवाद साधणार आहे. लेख - थोडंसं हलकं होऊया... मार्च महिना अखेर होता, मी मुंबईहून पुण्यास  काही ऑफिस कामानिमित्त दुपारी निघालो होतो. बस प्रवासं खंडाळा घाटातून सुरु होता. खिडकीतून निसर्ग न्याहळत होतो , सृष्टी दिव्य रूप धारण करत होती.  मनात विचार आला अशा उष्ण हवेत शुष्क झाडांना हिरवी पालवी कशी येते ? हा काय चमत्कार आहे ?  विचार चक्र सुरु झालं-वसंत ऋतूचे आगमन झाले की पानगळ होऊन झाडांना पालवी फुटते. पानगळ म्हणजे काय तर ज्याची आवश्यकता नाही ते निसर्ग टाकून देतो व झाडे हलकी होतात पुन्हा पालवी फुटते , ती  ताजीतवानी होतात. माझं कविमन जाग झालं- इथं हलक होणं म्हणजेच एक वेगळी आनंददायी अनुभूती घेणं - वर्षा ऋतूत जेव्हा पाऊस बरसतो त्यावेळी आकाश हलकं होत असतं, खरंच किती काळ ते ढगांना धरूनबसलेलं असतं ना,  शिल्पकार ज्यावेळी दगडातून मूर्ती घडवतो तो जडत्वाला हलकं करत असतो ,  वडील ज्यावेळी लहानग्या मुलाला खांद्यावर घेऊन ,  डोक्यावर   बसवून जग दाखवित असतात त्यावेळी ते स्वतः हलके होत असतात, आपली अपत्ये यशस्वी ...

कोवळं ऊन

सांगली कोल्हापूर मधील पुराचा हाहाःकार  आणि सामान्य जनतेचे हाल पाहून मनी उठलेले भाव .... Head and the Heart कोवळं ऊन  पाऊस कधीचा पडतो केव्हा विश्राम घेणार हा दिसणार ,मिळणार कधी ते कोवळं उन ? तिकडं सांगली,कोल्हापूर, कर्नाटक,ओरिसा .... डोळ्यात पाणी आणणारी आणि आटवणारी अतिवृष्टी ,पुराचा हाहाःकार  आणि इकडं एवढयाशा  कोवळ्या ऊनासाठी आसुसलेला मी ... सुखवस्तू सुंदर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मला हवं आहे अंगावर घेण्यासाठी  कोवळं ऊन  चोहोकडून फाटलेले आभाळ आणि विना छप्पर ती जनता कशी सांगड घालायची ? सांगा.. कशी सांगड घालायची? सुखलोलुपता आणि पूर्ण भिजलेल्या ,करपलेल्या भाकरीची, वैरण  विना दैना झालेल्या त्या मुक गुराढोरांची अन  पक्षी पाखरांची..  सारंच  ऋतुचक्र बदलतं  आहे झपाट्याने माल्थस चा सिद्धांत खरा ठरत आहे केव्हा कळणार मला कोवळं ऊन अंगावर नाही तर अंतरंगात पडायला हवं मडयावरच्या  लोणी खाणाऱ्या राजकारणा कडे दुर्लक्ष करायला हवं... Sympathy आणि Empathy मधील अं...

वाढदिवस

//श्री सरस्वती देवी प्रसन्न// वाढदिवस आज वाढदिवस दावती खुणावती गतवर्षे  येतो भारी आठव बाबांचा अन बाळकृष्ण तसबिरीचा काय साठवलं आणि निसटलं.... मम ओंजळीत चाळतो खतावणी करण्या उजळणी सत्कृत्याची  अन मांडणी , जुळणी नवसंकल्पांची  साठ पूर्ण एकषष्ठ  पदार्पण लाभले उत्तम आरोग्य वारसा मातृ-पितृ कुलाचा मी भाग्यवान मातृ-पितृ बंधू मित्र स्नेहजन प्रेम मिळाले उदंड ! अखंड उजळू दे अंतरी प्रकाश मांगल्याचा ,सहृदय ते चा , सौजन्य तेचा दूर लोटू दे काजळी अमंगलतेची आलो मानव जन्मा  जाणून घेऊ दे मर्म या जन्माच्या कार्य -कारणाचे सदा राहू दे मातृ छायेत , फिरू दे हात मायेचा पाठीवर ज्येष्ठांचा, मित्र परिवार अन आप्त स्नेहीजनांचा सुमार्ग पथी अग्रेसर होण्यास्तव ..... अखंड घडू दे साहित्यसेवा होण्या मन उन्नयन  अर्पितो काव्य सुमन नमितो नंदकिशोर शारदे तव कमलचरणांशी... 

श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत-

श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत असताना व्यक्त केलेले मनोगत- आज ३१ जुलै २०१९ कॉलेजच्या सन 1975 पहिल्या दिवसापासूनचा असलेला माझा वर्गमित्र गुरु आणि बँकेतील अत्यंत यशस्वी कारकीर्द असलेला अधिकारी श्रीयुत गुरुराज देशपांडे नोकरीतून निवृत्त होत आहे. त्यांच्या Send Off कार्यक्रमास उपस्थित राहण्याची माझी खूप इच्छा होती तू परंतु ते शक्य होत नसल्याने माझ्या भावना या पत्रातून मी व्यक्त करत आहे. गुरु हे व्यक्तिमत्व आणि त्यांची बँकेतील कारकीर्द याविषयी आज सांगितलं जाईलच. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले गुरु हा माझा कॉलेज मधील वर्गमित्र आहे. त्याच्या व माझ्या पहिल्या भेटीची आठवण अशी आहे. दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश करताना गुलबर्गा इथून आलेला पायजमा शर्ट आणि रबरी चप्पल व हसतमुख चेहरा अशा वेषात त्याची व माझी ओळख कॉलेजच्या काउंटरवर कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात प्रवेश घेताना फी भरताना झाली व त्यानंतर कॉलेज मध्ये वर्गात एकत्र बाकावर, समाज कल्याण केंद्र सोलापूर येथे त्यावेळच्या शिवाजी युनिव्हर्सिटी लायब्ररीत शेजारी शेजारी असा अभ्यास ...

शब्दांकुर...

// श्री शारदा देवी प्रसन्न // शब्दांकुर.. समर्थ रामदासांनी ग्रंथराज दासबोधामध्ये प्रथम दशक समास सातवा  यात कवेश्वरस्तवन लिहलं आहे. कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असं त्यांनी संबोधलं आहे . आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।  नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥ कविता अथवा काव्य कसे काय सुचते , काव्य प्रक्रिया कशी असते असे बरेच जणांना कुतूहल असते. वास्तविक कवी अथवा लेखक हा सर्वसामान्य माणसांसारखाच जगात वावरत असतो परंतु जगात चालणाऱ्या हालचाली, वस्तू यांच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी थोडी वेगळी असते. कविस व लेखक यास ही निसर्गदत्त देणगी असते . आपल्या स्वानुभवातून, अवलोकनातून, आकलनातून व परकाया प्रवेश करून त्याला सामान्य गोष्टीत ही काहीतरी वेगळं दिसतं त्याच्या हृदयी ते भिडतं  आणि ते अनावर स्फूर्तीने  कवितेतून व्यक्त होत जातं -जणू काव्य रुपी बीजांना  शब्दरूपी  अंकुर फुटतो. हेच भाव व्यक्त करणार माझं हे काव्य. शब्दांकुर  ...  नंदकिशोर लेले काव्य उमगे मनी कसे ? पृच्छा करी रसिक वदे कव...